Type Here to Get Search Results !

महाडीबीटी कृषी अनुदान योजना 2022 ऑनलाइन अर्ज सुरू

mahadbt tractar yojana 2022


महाडीबीटी योजना अर्ज 2022

सन 2021-22 मध्ये कृषि यांत्रिकीकरण योजना मध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित अवजारे खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येत आहे. त्यासाठी mahadbt पोर्टल वर ऑनलाइन अर्ज भरणे सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषियांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 फेब्रुवारी असून राज्य सरकारने पात्र शेतकर्‍यांना लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता काय

 • शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
 •  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
 • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
 •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा.
 • कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक.
 •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल.

ट्रॅक्टर अनुदान योजना कागदपत्रे

 • आधार कार्ड
 •  ७/१२ उतारा
 •  ८ अ दाखला
 •  खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
 •  जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
 •  स्वयं घोषणापत्र
 •  पूर्वसंमती पत्र

ट्रॅक्टर अनुदान योजना 

या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:

 • ट्रॅक्टर
 • पॉवर टिलर
 • ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
 • बैल चलित यंत्र/अवजारे
 • मनुष्य चलित यंत्र/अवजारे
 • प्रक्रिया संच
 • काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
 • फलोत्पादन यंत्र/अवजारे
 • वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
 • स्वयं चलित यंत्रे

महाडीबीटी ट्रॅक्टर अनुदान अर्ज भरण्यासाठी जवळच्या सेतु केंद्र, सीएससी सेंटर ला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवट दिनांक 30 जानेवारी 2022.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण वाचा 👇

आधार कार्ड वर मिळवा लोन फक्त 5 मिनिटातTags