Type Here to Get Search Results !

नगर जिल्ह्यातील हे धरण झाले ओवरफ्लो...

धरण पाणीसाठा अपडेट


भंडारदरा धरण पाणीसाठा

नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा, निळवंडे धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर ओसरला आहे. धरणाकडे होणारी आवक मंदावली असलीतरी पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सोडण्यात येत आहे.

भंडारदरात गत बारा तासांत 155 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. त्या सर्व पाण्याचा वापर करण्यात आला. 3598 क्युसेकने सुरू असलेले पाणी खाली निळवंडेत जमा झाले आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 9498 दलघफू होता. म्हणजे भंडारदरा धरण 86 टक्के भरले आहे


मुळा धरण पाणीसाठा

 मुळा पाणलोटातही पावसाचा जोर ओसरला आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 17446 होता. मुळा धरण 67 टक्के भरले आहे. कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 3212 क्युसेक होता

जायकवाडी धरण पाणीसाठा

जायकवाडी धरणातील उपयुक्तसाठा काल सायंकाळी 6 वाजता 82.16 टक्के इतका झाला आहे. या धरणातून सकाळी 6728 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होती. नंतर हा विसर्ग 11 वाजता 4064 क्युसेकवर आणण्यात आला.


Tags