महाडीबीटी ट्रॅक्टर अनुदान योजना 2022
महाडीबीटी (MahaDBT tractor subsidy ) यांच्या माध्यमातून ट्रॅक्टर्स, कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अनुदानासाठी अर्ज केलेल्या व अर्ज करू इच्छिणाऱ्या आणि अर्ज Tractor Subsidy Maharashtra करून अनुदानासाठी पात्र झालेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना कृषी यंत्र / ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देणारी महत्त्वाची योजना म्हणजे mahadbt कृषी यांत्रिकीकरण यपजणा 2022
ही योजना राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2018 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी 2022 या वर्षासाठी 300 कोटी रुपये निधि ठाकरे सरकारने मंजूर केला होता.
प्रत्येक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत लक्ष्य उपलब्ध करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत या योजनांचे लाभ द्यावेत अशा प्रकारचे आव्हान करण्यात आलं आहे.
या योजने अंतर्गत नव्याने अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सुद्धा लॉटरी काढण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर लवकरात – लवकर अर्ज करू शकता…
तर शेतकरी मित्रांनो आज आपण ट्रॅक्टर अनूदान योजना 2022 योजनेअंतर्गत अनुदानावर ट्रॅक्टरसाठी Tractor Subsidy Maharashtra अर्ज कसा करावा याविषयी माहिती पाहणारा आहोत. शेतकर्यांना त्यांच्या श्रेणीनुसार नवीन ट्रॅक्टर खरेदीवर शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. अन् यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात …
योजनेंतर्गत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात 1 ते 1.25 लाखांचा लाभ दिला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यासोबतच या बँक खात्यात आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.या योजनेअंतर्गत जनरल प्रवर्गासाठी 1 लाख रुपये अनुदान दिलं जातं तर, SC/ ST प्रवर्गासाठी 1 लाख 25 हजारांचे अनुदान दिलं जातं.
अर्ज मंजूर झाल्यानंतर ट्रॅक्टर खरेदीसाठी Tractor Subsidy Maharashtra शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या रकमेपैकी केवळ 35% रक्कम गुंतवावी लागेल.योजनेचा लाभ शेतीयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर असावी लागते. जमीन दुसऱ्याच्या नावावर असल्यास ट्रॅक्टर अनुदान मिळविण्यासाठी शेतकरी त्याच्या नावावर अर्ज करू शकत नाही.
mahadbt farmer scheme ट्रॅक्टर योजनेंतर्गत देशातील जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांना अधिक लाभ दिला जाणार आहे.
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे :-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असावी.
- जमिनीची कागदपत्रे :- 7/12 व 8A
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- आधार कार्ड
लॉटरी लागल्यानंतर ही कागदपत्रे अपलोड करावे :-
- ट्रॅक्टरचे कोटेशन
- टेस्ट रिपोर्ट
- डिलिव्हरी चालान
- बँक खाते पासबुक
- आधार कार्ड