गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महागला
LPG Gas Cylinder Price Hike : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर आता घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडर दरात वाढ झाली आहे.
LPG Gas Cylinder Price Hike : पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर आता इंधन दराचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य जनतेचा खिसा आजपासून कापला जाणार महागाईची झळ आणखी तीव्र होणार आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडरही महाग झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ किती ?
आजपासून देशात पेट्रोल-डिझेल महागलं. तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते.