Type Here to Get Search Results !

31 ऑगस्ट पूर्वी केवायसी करा तरच मिळेल 2000 हप्ता...

केवायसी केली तरच मिळेल 12 वा हप्ता(PM Kisan Scheme) पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत (e-KYC) ई-केवायसी हे पूर्ण करावे लागणार आहे. यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारने वेळोवेळी आवाहनही केले आहे. शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मात्र, योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही. त्यामुळे ही प्रक्रिया करणे महत्वाचे आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी 4 वेळेस मुदतवाढ देण्यात आली आहे.  31 ऑगस्ट ही शेवटची मुदत असून शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करावी असे आवाहन सरकारने केले आहे.

आता मोबाईल वर अशी करा केवायसी पूर्ण 👇👇

PM किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.
पेजच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.
आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड एंटर करा आणि सर्चवर क्लिक करा.
आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
'ओटीपी प्राप्त करा' आणि एंटर करा
सर्व तपशील योग्यरित्या जुळल्यास, eKYC पूर्ण केले जाईल. 


तुमचं मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक नसल्यास तुम्ही जवळच्या सीएससी, सेतु केंद्रावर जाऊन ई- केवायसी पूर्ण करू शकता.

ई-केवायसी का करावी ?

केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु केलेल्या पीएम किसान योजनेला आता 5 वर्ष पूर्ण होत आहेत. वर्षाकाठी 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे. चार महिन्यातून एकदा ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. 
मात्र, काही अपात्र, बोगस लाभार्थी पण या योजनेचा लाभ घेत आहे. ही बाब सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर ई-केवायसी ची अट घालण्यात आली होती. त्यामुळे अपात्र शेतकरी कोण आहेत त्यांच्याकडून आतापर्यंत जमा केलेली रक्कमही वसूल केली जात आहे. भविष्यात सरकारची फसवणूक होऊ नये म्हणून ही ‘ई-केवायसी’ ची अट घालण्यात आली आहे.
Tags