Type Here to Get Search Results !

नगर जिल्ह्यातील या कारखान्याने जाहीर केला 2500 रुपये भाव.

 सध्या उसाचा गाळप हंगाम सुरू झाला असून मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप सुरू आहे. राज्यातील बरेचशे  साखर कारखाने कार्यान्वित झाले असून गाळप हंगाम जोरात सुरू झाला आहे. उसाच्या बाबतीत उसाची एफआरपी असो की पहिली उचल याबाबतीत कायमच संघर्षाची परिस्थिती दिसून येते. परंतु या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी भावाची परंपरा कायम जपली आहे.

या कारखान्याने जाहीर केली पहिली उचल
तसेच या कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्तेचा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. कायमच शेतकऱ्यांचे व सभासदांचे व कामगारांचे हित जपणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने नगर जिल्ह्यात एफआरपी पेक्षा जास्त भाव दिला आहे.
यावर्षी देखील कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राच्या बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 2500 पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ऊस उत्पादन वाढावे यासाठी कारखान्याच्या वतीने विविध प्रकारचे उपक्रम देखील राबविण्यात येत आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने त्यांची उच्चांकी भावाची परंपरा कायम ठेवत सन 2022-23 या चालू हंगामासाठी पहिली उचल 2500 रुपये प्रतिटन जाहीर केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ यांनी दिली. मागच्या गळीत हंगामामध्ये 15 लाख 53 हजार मॅट्रिक टन अशा उच्चांकी उसाचे गाळप या कारखान्याने केले होते.
Tags