Type Here to Get Search Results !

भारतानं पाकिस्तानला चार विकेट्सनं दिली मात.

 T20 World Cup 2022: IND Vs PAK


भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) आक्रमक खेळीच्या जोरावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या भेदक गोलंदाजी करत कर्णधाराचा निर्णय असल्याचं सिद्ध केलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पार पडलेला सामना यंदाच्या टी-20 विश्वचषकातील आतापर्यंतच्या सामन्यापैकी सर्वात थरारक सामना असेल.

पाकिस्तानने भारतासमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवले होते

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं चार विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पावर प्लेमध्ये भारताने कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची महत्वाची विकेट्स गमावली. त्यानंतर सूर्यकुमार यादवही स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं संघाची जबाबदारी खांद्यावर घेत भारताच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. मात्र, शेवटच्या चेंडूवर 1 धाव काढून भारताने पाकिस्तान वर विजय मिळवला. 

Tags