Type Here to Get Search Results !

हे आहेत सोयाबीन आणि कापूस बाजारभाव ...

soyabin and cotton rates 


कापूस बाजारभाव दर. (cotton rates)

देशातील कापूस बाजारावर महागाईमुळं दबाव असल्याचं सांगितलं जातं. अनेक देशांमध्ये महागाई वाढल्यानं कापडाची मागणी कमी झाली. परिणामी भारताची कापड निर्यातीवर परिणाम झालाय. त्यामुळं उद्योगाकडून कापसाची खरेदी धिम्या गतीनं सुरु आहे. कापडाची मागणी वाढल्यानंतर कापसालाही उठाव मिळेल. सध्या कापसाला सरासरी 7 हजार ते ९ हजार ५०० रुपये दर मिळतोय. नोव्हेंबरच्या शेवटी कापसाला मागणी वाढण्याची शक्यता असून सरासरी दर ९ हजार रुपये राहू शकतो, असा अंदाज कृषि जाणकारांनी व्यक्त केला आहे.

काय आहेत सोयाबीनचे दर (soyabin Rates)

सद्या नव्या सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. तर जूनं सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयानं विकलं जातंय. सोयाबीनमधील ओलावा कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना किमान सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

देशातील बाजारांमध्ये मागील दोन आठवड्यांपासून सोयाबीनची आवक सुरु झाली. दिवाळी आणि रब्बी पेरणीची नड असल्यानं शेतकरी सोयाबीन काढणी (Soybean Harvesting) केल्यानंतर लगेच बाजारात नेत आहेत. त्यामुळं सध्या होत असलेल्या आवकेत पावसानं ओलं झालेल्या सोयाबीनचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं बाजारात दरही (Soybean Rate) कमी मिळतोय. 

सध्या आंतराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दरात घसरण सुरू आहे, त्यात पुढील काळात वाढ होण्याची शक्यता आहे.नंतर सोयाबीन दरही सुधारु शकतात. 

Tags