Type Here to Get Search Results !

आजपासून LPG सिलिंडर झाले स्वस्त, किती ते पहा...

 व्यावसायिक LPG सिलिंडर झाले स्वस्त



ऑगस्ट महिन्याची सुरुवात होताच गॅस वितरण कंपन्यांनी व्यावसायिक ग्राहकांना दिलासा दिला आहे. कंपन्यांकडून सोमवार, 1 ऑगस्ट 2022 रोजी एलपीजी सिलिंडरच्या (Cylinder) कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, ही कपात केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरवर आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार, आज व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये 36 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून राजधानी दिल्लीत (Delhi) 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1,976 रुपये होणार आहे. हे नवे दर आज सकाळी 6 पासून लागू झाले आहेत.

कोणाला फायदा होणार?

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच IOC च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 36 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्स, ढाबा आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांना 19 किलोचा सिलेंडर 36 रुपयांनी स्वस्त होण्याचा मुख्य फायदा मिळणार आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किंमती प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला निश्चित केल्या जातात. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीही कमी करण्यात आल्या होत्या. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत

विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती आज ना महाग ना स्वस्त झाल्या आहेत. 14.2 किलोचे घरगुती एलपीजी सिलिंडर 6 जुलैच्या दराने उपलब्ध आहे आणि त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Tags