पीक विमा मुदतवाढ
pik vima 2022 last date
चालू वर्षी राज्यात खरीप हंगाम 2022 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना ही बीड पॅटर्ननुसार राबवली जात आहे. या योजनेत केलेल्या बदलामुळे शेतकरी (Agriculture) अतिशय उत्साहीपणे योजनेमध्ये सहभागी होत आहेत.
साधारणपणे 80 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्याने या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत आपल्या विमा पॉलिसी काढलेल्या आहेत. याच योजनेसाठी पिक विमा (Crop Insurance) भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2022 होती. ज्यात आता वाढ करण्यात आली आहे.
किती वाढली मुदत ?
आज 31 जुलै रोजी रविवार असल्यामुळे शासकीय सुट्टी आहे. याचमुळे केंद्र शासनाने मुदत वाढून देण्यात आली आहे. आता ही तारीख 1 ऑगस्ट 2022 करण्यात आली आहे.तसे सरकारने एक प्रसिद्धी पत्रक काढून सर्व राज्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पीक विमा साठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहे. तरी आता या झालेल्या मुदतवाढीचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.