Type Here to Get Search Results !

अखेर पावसाला मुहूर्त मिळाला, या भागात होणार जोरदार पाऊस..

 Maharashtra Rain Update 

 राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसानं (Rain) दडी मारली आहे. काही भागत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह कोकणात मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. 

24 ते 26 सप्टेंबर दरम्यान या भागात पावसाची शक्यता

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे 23 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.