Type Here to Get Search Results !

जायकवाडी धरण किती भरले पहा..

 जायकवाडी धरण पाणीसाठा

नाशिक भागात जोरदार पाऊस झाल्यास तेथील धरणे भरल्यावर खाली गोदावरीच्या माध्यमातून पाणी जायकवाडी धरणात सोडले जाते. मात्र, यंदा नाशिक भागात जोरदार असा पाऊस झालाच नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जायकवाडी धरणात पाणी आलेच नाही. अशा परिस्थितीत धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. आता पावसाळा सुरु होऊन अडीच महिने उलटले असून, जायकवाडी धरणात फक्त 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे 1 जूनपासून आतापर्यंत 326.7490 दलघमी पाण्याची धरणात आवक झाली असून, ही आवक किंचित असल्याचे सांगितले जात आहे. 

जायकवाडी धरणातील पाणीसाठा 

जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1506.81 फूट 

जायकवाडी धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.274 मीटर 

एकूण पाणीसाठा दलघमी : 1454.612 दलघमी

जिवंत पाणीसाठा दलघमी : 716.506 दलघमी

जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 33.00 टक्के 

उजवा कालवा विसर्ग :900 क्युसेक 

डावा कालवा विसर्ग : 1500 क्युसेक 

Tags