Type Here to Get Search Results !

25% अग्रिम पीक विमा 2023 या जिल्ह्यात मंजूर...(Insurance Claim)

चालू खरीप हंगामामध्ये भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते आणि त्यामुळे पीक विमा देण्यासंदर्भात पीक सर्वेक्षणाचे आदेश देखील देण्यात आले होते सर्वेक्षणाच्या अहवालानुसार बऱ्याचशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 25% अग्रीम पीक विमा देण्यासंदर्भात पिक विमा कंपनी देखील निर्गमित केलेले आहे.

crop-insurance-2023-list

शेतकरी बंधुनो कृषी विद्यापीठाकडून तत्कालीन परिस्थितीचा गुगल आधारित डेटा प्राप्त करून त्याची पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना विमा तातडीने वितरित करण्यात यावा तसेच चालू वर्षाच्या हंगामातील 25% अग्रिम विम्याबाबत पावसाच्या खंडाचे अहवाल ग्राह्य धरून तातडीने कार्यवाही पूर्ण करून दिवाळीपूर्वी अग्रीम वितरित करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.

25% अग्रिम पीक विमा देण्याची घोषणा 

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्याची घोषणा केली आहे. कृषिमंत्र्यांनी हे सुध्दा सांगितले की, 25% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत मिळेल. हे पैसे शेतकऱ्यांना पीक संपल्यानंतर मिळतील.(25% insurence claim)

महाराष्ट्र राज्यातील ६५% उत्पन्न हे शेतीवर अवलंबून असते परंतु गेली काही दिवस राज्यातून पावसाने दडी मारली आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राच्या राज्यातील तब्बल 231 मंडळांना आता आगाऊ पिक विमा मिळणार आहे याबाबतची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

या जिल्ह्यात विमा मंजूर 👇👇

राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला असल्याचे कृषी आयुक्तालय कडून सांगण्यात आली आहे. पीकविमा मंजूर जिल्हे बद्दल बोलायचे झाल्यास पहिल्या टप्प्यात अजून तरी बीड आणि लातूर या २ जिल्ह्यांना पीकविमा मंजूर करण्यात आला आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यातील ८७ महसूल मंडळांना आणि लातूर जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांना २५% अग्रीम पिक विमा देणार असल्याची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

खरीप हंगाम पिकविमा 2023:

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाच्या पडलेल्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आणि ज्या ज्या महसूल मंडळामध्ये अशा प्रकारचे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्या जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी कार्यलयाच्या माध्यमातून अधिसूचना काढून संबंधित शेतकऱ्यांना 25% पीक विमा देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.(crop insurance list 2023)

परंतु मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यात अद्याप अधिसूचना न काढल्यामुळे तेथील शेतकरी हे हवालदिल झालेले दिसत होते. बरेच शेतकरी क्लेम करत असताना दिसत होते, परंतु पीक विमा कंपनी कडून ते केलेले क्लेम बाद करण्यात येत होते.(crop insurance 2023)

पीक सर्वेक्षण अहवाल देणार

25% पिकविमा संदर्भातील अधिसूचना काढण्यात आलेली आहे, आणि आता कृषी विभागाच्या माध्यमातून, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून, व स्थानिक प्रतिनिधीच्या माध्यमातून मंडळामध्ये कापूस, सोयाबीन, व मका या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण केले जाईल, आणि याच्या नंतर आपला आहवाल सादर केल्यानंतर जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून 25% अग्रीम पीक विमा देण्यासाठी निर्देश देण्यात येतील.( All India Insurance)