Type Here to Get Search Results !

चुकीचे फोनपे, गूगल पे झाले तर काय करावे? वाचा संपूर्ण माहिती..(how reverse wrong upi payment)

 UPI Payment Issues : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI म्हणजे आजकालचा बेस्ट पर्याय. अगदी छोट्या दुकानापासून ते मोठमोठ्या शोरुम, ज्वेलर्समध्येही युपीआय पेमेंट होत असतं. आपण एकमेंकांनाही युपीआयचा वापर करुनच पैसे पाठवतो. दरम्यान भारतातील UPI आधारित अॅप्समध्ये PayTM, PhonePe, GPay हे असे काही अॅप्स आहेत जे फार लोकप्रिय आहेत. परंतु घाईघाईने चुकीच्या बँक खात्यात पैसे जर ट्रान्सफर झाले तर काय कराल? घाबरण्याचं कारण नाही, (UPI wrong payment)

upi-payments-apps

सर्वात आधी UPI कस्टमर सपोर्टशी संपर्क साधा

जर कोणत्याही युजरने चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवले आहे, तर त्याने सर्वात आधी संबधित अॅपच्या कस्टमर सपोर्टशी संपर्क साधाला पाहिजे, असे RBI (Reserve Bank Of India) बँक सांगते. म्हणजेच Gpay, PhonePe, Paytm किंवा कोणत्याही इतर युपीआय अॅपद्वारे व्यवहार केला असल्यास त्यांच्या कस्टमर सपोर्टशी संपर्क साधावा. त्यांच्याकडूनच संपूर्ण मदत मिळणार आहे.

त्यानंतर तुमच्या बँकशी संपर्क साधा

UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असल्यास तुम्ही ज्या खात्यातून ही रक्कम गेली आहे. त्या तुमच्या बँकेशी संपर्क साधा. व्यवहार आयडी, खाते क्रमांक, प्राप्तकर्त्याचा UPI आयडी, फोन नंबर यासारखे संपूर्ण तपशील बँकेसोबत शेअर करा. तुम्ही बँक व्यवस्थापनाच्या मदतीने देखील रिफंड मिळवू शकता.(wrong bank payment by upi)

NPCI पोर्टलवर तक्रार नोंदवा

UPI हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने विकसित केले आहे. NPCI स्वतः UPI द्वारे सर्व व्यवहारांशी संबंधित शंकाचे, तक्रारींचे व्यवस्थापन करते. त्यामुळे तुम्ही चुकीच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर केले असल्यास याच NCPI कडे तक्रार करु शकता. ज्याने तुम्हाला तुमचा रिफंड मिळण्यात मदत होईल.

NPCI वर तक्रार कशी करावी 👇👇

1: सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये NPCI ची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.

2: आता तुम्हाला वरच्या मेनू बारमधील 'What we do' विभागात जावे लागेल.

3: येथे ड्रॉप डाउन मेनूमध्ये, तुम्हाला UPI वर टॅप करावे लागेल आणि Dispute Redressal Mechanism वर क्लिक करावे लागेल.

4: खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला तक्रार विभाग दिसेल.

5: आता तुम्हाला व्यवहाराचे स्वरूप निवडावे लागेल.

6: आता तुम्हाला इश्यू सेक्शनमध्ये "Incorrectly transferred to another account" निवडावे लागेल. यासोबतच तुम्हाला सर्व माहिती नीट भरून तुमची तक्रार नोंदवावी लागेल.