Type Here to Get Search Results !

रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट किंवा कमी कसे करावे, संपूर्ण मराठी माहिती.

 Free Ration yojana maharashtra 


मोफत रेशन योजना

देशातील अनेक गरजू लोकांसाठी सरकार विविध योजना राबवत आहे. या योजनेचा फायदा अनेक गरजू लोकांना देखील मिळत आहे. या योजनांपैकी एक योजना म्हणजे मोफत रेशन (Free ration scheme ) होय.

ही योजना केंद्र सरकारकडून (Central government) राबविली जाते. या योजनेचा तब्बल 80 कोटी लोकांना फायदा होत आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लोकांकडे शिधापत्रिका (Ration Card) असणे आवश्यक आहे. 

कोविड लॉकडाउन काळापासून मोफत रेशन वाटप देखील सुरू आहे. परंतु अनेकवेळा काही कारणाने कुटुंबातील सदस्याचे नाव रेशन कार्डमधून कमी केले जाते किंवा वगळले जाते. जर तुम्ही रेशनकार्डमधून एखाद्याचे नाव कमी केले आहे किंवा तुम्ही दुसरे सद्स्याचे नाव कसे जोडू शकता ही ही माहिती आज आपण पाहूया.

रेशन कार्ड मधील नावे ऑनलाइन असे तपासा 👇check online ration card

तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव रेशन कार्डमधून कापले गेले आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला https://nfsa.gov.in/Default.aspx या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला ‘रेशन कार्ड’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता ‘Ration Card Details On State Portals’ या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचे राज्य, जिल्हा ब्लॉक आणि पंचायत निवडा.

आता पुढे तुम्हाला तुमचे रेशन दुकान, रेशन डीलरचे नाव आणि तुमच्या रेशन कार्डचा प्रकार निवडावा लागेल. यानंतर, कार्डधारकांची यादी तुमच्यासमोर येईल, जिथे तुमचे नाव कापले गेले आहे की नाही हे तुम्हाला कळू शकते.

रेशन कार्ड मध्ये नाव असे जोडा 👇 how to add names in ration card

जर तुमचे नाव यादीतून वगळले असेल किंवा तुम्हाला एखादे नाव रेशन कार्ड मध्ये समाविष्ट करायचे असेल तर  तुमच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागात (food supply department) जावे लागेल. येथे फॉर्म भरा आणि संबंधित कागदपत्रे जोडून सबमिट करा. नंतर पडताळणी झाल्यानंतर तुमचे नाव रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका मध्ये जोडले जाते.