Type Here to Get Search Results !

नगर मार्केटला कांद्याला उच्चांकी भाव..

नगर मध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

अहमदनगर : गेल्या महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसाने नवीन कांदा रोपांचे झालेले नुकसान, तसेच चाळीतील कांदाही खराब झाल्याने दिवाळीनंतर कांद्याची आवक घटली असून कांद्याचे भाव साडेतीन हजारांच्या पुढे गेले आहेत. नगर बाजार समितीत झालेल्या लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला ३८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. या वर्षीचा हा उच्चांकी भाव आहे. 

लासलगाव : दिवाळीच्या नऊ दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू होताच दरात वाढ झाल्याचे बघायला मिळाले. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला समाधानकारक भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दिवाळीपूर्वी २१ ऑक्टोबरला लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची १४ हजार ७९२ क्विंटल आवक झाली होती; तर बाजारभाव ६०० ते २३५० व सरासरी १८६० रुपये प्रतिक्विंटल होते. दिवाळीनंतर सोमवारी समितीत ११ हजार ८४६ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होऊन ८५१ते ३१०१ व सरासरी २४५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

बाजार समितीत कांदा आवक कमी झाल्याने भाव वाढत आहे, पुढील काळात आणखी मार्केट वाढण्याची शक्यता आहे.

Tags