Type Here to Get Search Results !

पंजाब डख यांचा पावसाचा अंदाज पहा..

पंजाब डख यांचा आजचा हवामान अंदाज 



राज्यात मागच्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरू केले आहे. सध्या मुंबई आणि ठाणे परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. इतकेच नव्हे तर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यात आता राज्यातील पाऊस परिस्थिती संदर्भात हवानान खात्याने अलर्ट जाहीर केला आहे.

महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उद्यापासून मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य व लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर ओडिशा, महाराष्ट्र व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 5 दिवसांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.

पंजाब डख यांचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामान विभागाने  आज राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्यात आवाहन करण्यात आले आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. punjab dakh rain updates

दरम्यान, मराठवाडामध्ये देखील पावसाची शक्यता असल्याने मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. यानंतर हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील आपला हवामान अंदाज  सांगितला आहे. ते म्हणाले, आजपासून राज्यात अतिवृष्टी होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात दहा सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टी होणार आहे.

या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस

हवामान अंदाजानुसार  आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीमहाराजनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

ट्रॅक्टर लाभार्थी लॉटरी 👉महा डीबीटी लाभार्थी यादी 
पीएम किसान योजना 👉लाभार्थी पात्र यादी
महा डीबीटी लॉटरी 2022 👉लॉटरी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री आवास योजना 👉घरकुल मंजूर यादी येथे पहा

अनेक ठिकाणी वीज पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी यादरम्यान आपली व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन पंजाबराव यांनी केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे येणारे चार दिवस महत्वाचे आहेत.

Tags