लाडकी बहीण नोव्हेंबर हप्ता जमा
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते. या योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून लाभार्थी महिला हप्त्याची वाट पाहत होते. डिसेंबर महिना संपला तरीही नोव्हेंबर महिन्याचा योजनेचे पैसे मिळाले नव्हते. अखेर लाभार्थींच्या चेहऱ्यावर आनंद हासू उमटलंय. त्याचं कारण म्हणजे, आज लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात झालीय.
आधी नवीन वर्षात महिलांना या योजनेचे पैसे मिळतील, अशी चर्चा होती, मात्र सरकारनं ३१ डिसेंबरला म्हणजेच थर्टी फस्टच्या दिवशी बँक खात्यात पैसे पाठवले. दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी सरकारनं ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची सक्ती केली होती. मात्र ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना हा हप्ता मिळणार.
लाडकी बहीण योजनेच्या जवळपास अडीच कोटींच्या जवळपास लाभार्थी आहेत. यापैकी आतापर्यंत १ कोटी ६० लाख महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलीय.अजूनही ३० ते ४० लाख महिलांची केवायसी झाली नाहीये. जर केवायसी केले नाही तर योजनेतून अपात्र केले जाणार आहे.
महिला बचत गट कर्ज.
आता महिलांना जवळपास २५ लाखांचे कर्ज मिळणार आहे. त्यासाठी गावातील महिलांना बचत गट स्थापन करायचा आहे. बचत गटाला हे कर्ज दिले जाते. यामुळे महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होत असते. महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटाला १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर बँकांकडून दीड लाखांपर्यंत कर्ज मिळत असते. कर्ज परत केल्यानंतर महिलांना तीन लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. आता कर्जाची मर्यादा वाढवून देण्यात येणार आहे. बचत गटाने व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याचा कृती आराखडा बँकेत सादर करावा लागेल. यानंतर त्यांना ३ ते २५ लाखांपर्यंत कर्ज मिळेल. यामुळे लहान व्यवसायांना प्रोत्साहन मिळणार आहे.
