पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला ₹6000 रुपये दिले जातात. ही रक्कम तीन भागात विभागली जाते — म्हणजे दर चार महिन्यांनी ₹2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.
सध्या या योजनेचा 21वा हप्ता येण्याची तयारी सुरू आहे. 19 नोव्हेंबर 2025 रोजी हप्ता जमा होणार आहे.
