Type Here to Get Search Results !

कांदा पीक- खत व्यवस्थापन

Onion crop- Fertilizer management

कांदा पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन  घेण्यासाठी प्रति एकरी 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत वापरणे आवश्यक आहे. शेणखत शेतात पसरवून, नांगरट करून मातीमध्ये मिश्रित करावे. शेणखत अर्धवट कुजलेले असेल तर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

कांदा पिकासाठी आवश्यक खते कोणती

  • युरिया - कांदा लागवडीनंतर सुरूवातीला दोन महिन्यांपर्यंतच नत्राची (Uria) गरज जास्त असते. कांदा पूर्ण वाढल्यानंतर नत्राची आवश्‍यकता नसते. अमोनिअम सल्फेट हे युरिया साठी उत्तम पर्यायी खत आहे.
  • सुपर फॉस्फेट - मुळांच्या चांगल्या वाढीकरिता स्फुरदाची आवश्‍यकता असते. शक्यतो लागवडीपूर्वी स्फुरद जमिनीत माती मिक्स करावे म्हणजे नवीन मूळ तयार होईपर्यंत स्फुरद उपलब्ध होते.
  • पोटॅश -  पालाश झाडांच्या पेशीमध्ये इतर मूलद्रव्यांच्या वाहतुकीसाठी आवश्‍यक असते. पेशींना काटकपणे देते व पिकांची रोगाविषयी प्रतिकारक शक्ती वाढवते. कांद्याची साईझ वाढण्यासाठी पालाश आवश्यक आहे.
  • कांदा पिकासाठी गंधकयुक्त खतांची गरज भासते. गंधकामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते. माती परीक्षणानुसार प्रति एकरी 20 किलो ग्रॅम गंधकयुक्त खते जमिनीत मिसळून द्यावीत.

कांदा पिकासाठी खत किती वापरावे

  • कांदा पिकास साधरणपणे 60 किलो नत्र, 20 किलो स्फुरद, 30 किलो पालाश आणि 20 किलो ग्रॅम गंधकयुक्त खते द्यावीत.
  •  रासायनिक खतापैकी 1/3 भाग नत्र, संपूर्ण स्फुरद, पालाश व गंधक लागवडीच्या वेळी आणि राहिलेले नत्र दोन हप्त्यांत विभागून द्यावे. नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर 30 दिवसांनी आणि दुसरा त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी द्यावा.
  •  कांदा पिकास नत्रयुक्त खत शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त व लागवडीच्या 60 दिवसांनंतर दिल्यास डेंगळे येणे, जोड कांदा येणे, कांदा साठवणक्षमता कमी होते.
  • कांदा लागवड दोन महिने झाल्यानंतर  00:52:34 प्रति लिटर पाण्यात घेवून फवारणी करावी. त्यानंतर अवश्यकता असल्यास  00:00:50 प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • कांदा काढणी अगोदर 10-15 दिवस 0.1% बाविस्टीनचा स्प्रे घेतल्यास कांद्याची साठवण क्षमता अधिक वाढते.

हे पण वाचा

ठिबक आणि तुषार सिंचन साठी सरसकट ८०% अनुदान

ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 % अनुदान योजना 

सौर कृषि पंप योजना अर्ज सुरू


Tags