Type Here to Get Search Results !

फक्त एक दिवस बाकी, ही कामे आजच करा नाहीतर होईल मोठे नुकसान...

Last date Today 31 jul 2022
आज 31 जुलै 2022 या महिन्याचा शेवटचा दिवस. आज अनेक कामांसाठीची मुदत संपत आहे. त्यामुळे जर तुमची ही कामं राहिली असतील तर ही कामं लगेच पूर्ण करुन घ्या, अन्यथा तुमच्या समोर अनेक अडचणी येतील. याशिवाय तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे ही कामं आजच आटपून घ्या नाहीतर तुम्हाला नुकसान भोगावं लागेल. 

1. आयटी रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख (ITR Filing Deadline) 

आज आयटी रिटर्न दाखल करण्याची (ITR Filing Deadline) शेवटची तारीख आहे. यानंतर आयकर परतावा दाखल केल्यास दंड भरावा लागणार आहे. आर्थिक वर्ष 2021-22 किंवा मूल्यांकन वर्ष 2022-2023 साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. यावेळी सरकारने मुदतवाढ न देण्याचे संकेत दिले आहेत. जर तुम्ही अंतिम मुदतीपर्यंत ITR दाखल करू शकत नसाल, तर तुम्हाला ITR उशिरा दाखल करताना दंड भरावा लागेल. याशिवाय, तुम्हाला आयकर विभागाकडून प्राप्तिकर सूचना मिळू शकते. यानंतर, तुम्हाला कर भरावा लागेल, तसेच दंड भरावा लागेल.

2. पीएम किसान योजनेसाठी E-KYC भरण्याची अंतिम मुदत


पीएम किसान योजनेसाठी E-KYC (PM Kisan Scheme E-KYC) भरण्यासाठीही आज अंतिम मुदत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सहजरित्या लाभ मिळावा यासाठी यावा केंद्र सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख पडताळणी (ई-केवायसी) करण्याचा योजना राबवली. E-KYC पूर्ण करण्यासाठी 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं ज्या लाभार्थ्यांनी 31 आपली ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांना ती 31 जुलैच्या आत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

3. रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक

जर तुम्ही उत्तराखंडचे रहिवासी आहात तर तुम्हाला सरकारच्या तीन मोफत सिंलेडर मिळण्याच्या योजनेचा लाभ मिळण्याची आज शेवटची तारीख आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करावं लागेल. यासाठी सरकारने 31 जुलैपर्यंतची अंतिम मुदत दिलेली आहे.

4. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक शेवट तारीख 

जर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेले नसेल तर लगेच करून घ्या नाहीतर, तुम्हाला दंड भरावा लागेल. त्यासाठी सरकारने आज 31 जुलै ही अंतिम तारीख दिली आहे. 
Tags