Type Here to Get Search Results !

मातोश्री शेत रस्ते योजना मंजूर यादी,

मातोश्री शेत रस्ते योजना मंजूर यादी


मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद शेतरस्ते योजना

राज्यातील प्रत्येक गावामध्ये शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्यास ११ नोव्हेंबर २०२१ रोजी एक शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे. 


राज्यातील शेतकरी आणि गावकरी यांची रस्ते आणि शेतमालाची वाहतुकीची अडचण यासाठी  ‘मी समृध्द तर गाव समृध्द’ आणि ‘गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द’ ही संकल्पना मनरेगा व राज्य रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

शेत रस्ते पाणंद रस्ते निधि किती ?

मातोश्री शेत रस्ते योजना मध्ये मुरूमाच्या कच्च्या रस्त्यासाठी 9 लाख रुपये निधि मिळेल. तर खाडीच्या पक्क्या रस्त्यासाठी 23 लाख रुपये पर्यन्त निधि प्राप्त होणार आहे.


  पाणंद शेत रस्ते मंजूरी प्रक्रिया  –

1) शेत/पाणंद रस्ते ग्राम पंचायत, जिल्हा परिषद बांधकाम विभाग/उप विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग/उप विभाग, वन जमीन असेल तेथे वनविभागामार्फत तयार करण्यात येतील.

2) ग्रामपंचायतीने रस्त्यांचा आराखडा ग्रामसभेच्या मंजूरीने 31 मेपर्यंत तयार करुन गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करायचा असून ते तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या शेत/ पाणंद रस्त्यांची यादी 15 जूनपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करतील.


3) त्यानंतर त्यांच्याकडून रोहयो सचिव आणि सचिवांकडून ग्रामविकास मंत्री यांच्याकडे 31 जुलैपर्यंत सर्व राज्यातील ग्रामपंचायतींच्या आराखड्यांची यादी पाठवली जाऊन ग्रामपंचायत निहाय शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना पूरक निधी मंजूर करावयाच्या यादीस 15 ऑगस्टपर्यंत मान्यता देतील.

या योजनेअंतर्गत सर्व शेतांपर्यत मजबूत व दैनंदिन कामासाठी वापरता येतील असे शेत रस्ते, पाणंद तयार करता येणार आहेत. प्रत्येक गावात सरासरी 5 किलोमीटर्सच्या शेत, पाणंद रस्त्यांची गरज आहे. राज्यात अशा रितीने राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधण्यात येणार आहेत.


आधार कार्ड वर मिळवा लोन फक्त 5 मिनिटात