सौर कृषि पंप योजना
आपल्या जिल्ह्यातील सौर पंप कोठा कसा चेक करावा ?
ओपन कास्टसाठी सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध आहे की नाही, त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात माहिती जाणून घेवूयात. बरेच शेतकरी बांधव सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत. परंतु अनेक जिल्ह्यासाठी सौर कृषी पंपाचा कोटा संपलेला असतो.
सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी कुसुमच्या अधिकृत संकेत स्थळावर जावून हा अर्ज करावा लागतो. या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांचा आधार नंबर आणि मोबाईल टाकून माहिती भरावी लागते. तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडून तुम्ही तुमच्या गावासाठी किंवा तालुक्यासाठी किती सौर कृषी पंपाचा कोटा शिल्लक आहे ते बघू शकता.
हे पण वाचा - पीएम किसान ekyc अशी करा
या जिल्ह्यासाठी सौर पंपाचा कोटा उपलब्ध 👇👇
चंद्रपूर जिल्ह्यातील ओपन कास्ट साठी सोलार कृषि पंप कोठा शिल्लक आहे, लवकरात लवकर अर्ज करा.
मित्रांनो तुम्हाला माहितच आहे कि हा कोटा कधीही कमी किंवा जास्त होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर हा लेख वाचत असाल तर हा कोटा संपण्याच्या आत लगेच सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करून द्या.
शेतकरी बंधुंनो तुम्ही ज्या जिल्यातील असाल तो जिल्हा, तुमचा तालुका आणि तुमचे गाव निवडून तुमच्या तालुक्यासाठी सौर पंपाचा कोटा उपलब्ध आहे किंवा नाही हे तपासून बघायचे आहे. कोटा उपलब्ध असल्यास १०० रुपये एवढी फी भरून अर्ज भरण्यास सुरुवात करायची आहे.
असा करा ऑनलाईन अर्ज
शेतकरी बधुंनो सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
सौर कृषि पंप ऑनलाइन अर्ज साठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
https://www.mahaurja.com/ या वेबसाईटला भेट द्या किंवा येथे टच करा ( फक्त हीच अधिकृत वेबसाइट असून याच ठिकाणी ऑनलाइन अर्ज करा. )
जेव्हा तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्पुटरवर महाउर्जा वेबसाईट ओपन होईल त्यावेळेस स्क्रीनच्या उजव्या बाजूला महाकृषी उर्जा अभियान कुसुमसौर कृषी पंप अर्ज नोंदणी अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक क्लिक करा.
https://kusum.mahaurja.com/ या पेजवर तुम्ही रीडायरेक्ट व्हाल याच ठिकाणी तुम्हाला तुमचा सौर कृषी पंपाचा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. डायरेक्ट अर्ज नोंदणी पेजवर जाण्यासाठी येथे टच करा.