Type Here to Get Search Results !

एक शेतकरी एक ट्रान्स फार्मर डीपी योजना 2022ऑनलाइन अर्ज

Ek shetkari ek tramsformer dp yojana 2022 ek shetkari ek dp yojana कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 अंतर्गत कृषीपंपांना नवीन वीज जोडणी व अनुषंगिक विद्युत पायाभुत सुविधा उभारण्याकरिता दरवर्षी रु.1500 कोटी इतके भागभांडवल देण्याची योजना सदर योजने अंतर्गत सन 2021-22 या वर्षाकरिता प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

एक शेतकरी एक डिपी २०२२ कोणाला लाभ मिळणार

  • ज्या नविन कृषी पंप अर्जदाराच्या कृषीपंपाचे अंतर, नजीकच्या लघुदाब वाहिनीच्या पोलपासून २०० मीटरच्या आत आहे अशा नविन कृषीपंप अर्जदारांना महावितरणद्वारे लघुदाब वाहिनीवर वीज जोडणी देण्यात येणार आहे.
  • ज्या नविन कृषीपंप अर्जदाराच्या कृषीपंपाचे अंतर, नजीकच्या लघुदाब वाहिनी पासून २०० मीटरपेक्षा जास्त आहे परंतु उच्चदाब वाहिनी पासुन ६०० मीटरच्या आत आहे अशा नविन कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीवर वीज जोडणी देण्यात येणार आहे.
  • उच्चदाब वाहिनी पासून ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास पारेषण विरहीत (Off Grid) सौरऊर्जेवर चालणारे कृषीपंप देण्यात येणार आहे.

सदर धोरणा अंतर्गत महावितरणकडे दरवर्षी सर्वसाधारणपणे प्राप्त होणाऱ्या मागणीचा विचार करता अंदाजे १ लाख कृषीपंप अर्जदारांना पारंपारिक पध्दतीने लघुदाब वाहिनीवर व उच्चदाब वितरण प्रणालीवर वीज जोडणी देण्याचे नियोजित आहे.

त्यापैकी सुमारे ४०,००० कृषीपंपांचे पारंपारिक पद्धतीने लघुदाब वाहिनीवर ऊर्जीकरण करण्याकरीता लागणारा निधी महावितरणतर्फे उपलब्ध करुन देण्याचे नियोजित असून व उर्वरित सुमारे ६०,००० कृषीपंपांचे पारंपारिक पध्दतीने उच्चदाब वितरण प्रणालीवर ऊर्जीकरण करण्याकरिता प्रती पंप रु.२.५० लाख याप्रमाणे प्रतिवर्षी रु.१,५०० कोटी भागभांडवल,धोरण कालावधीत शासनाद्वारे महावितरणला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

Online Form – Click Here – Link 2


एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर डीपी योजना Online Form 2021-22

योजनाचे नाव एक शेतकरी एक डीपी योजना 2021-22
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र सरकार
योजनेचा  उद्देशमहाराष्ट्र सरकार राज्य के किसानो को बिजली के कमी से छुटकारा देना
कधी सुरु झाली २०१८ मध्ये 

एक शेतकरी एक डीपी योजना फायदे काय?

अनियमित वीज, लाईट निघून जाणे, तारांवर लटकणे, वीजपुरवठा खंडित होणे, जीवाला धोका या सर्व समस्यांपासून राज्यातील शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी उच्च दाबाची वीज बदली (एचव्हीडीएस) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आतापर्यंत ९० हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेसाठी 1134 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन शासनाकडून महावितरण कंपनीला 2,248 कोटी रुपयांचा आर्थिक निधी दिला जाणार आहे.


एक शेतकरी एक डीपी योजना ऑनलाइन फॉर्म 👇👇

Click Here

Tags