Type Here to Get Search Results !

तुर पिकातील मर रोग नियंत्रण

 तुर पिकातील मर रोग नियंत्रण व्यवस्थापन

tur-pik

या वर्षी तुर मर किंवा उधळण हा रोग मोठ्या प्रमाणात तुरीवर येणार आहे हा रोग तुर पिकाला रोपवस्थेपासून ते फुले व शेंगा भरणी होवे पर्यंत तुर पिकावर होते व उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात घट येते..

थंडी तिल कमी जास्त प्रमाण व जमिनीचे तपामान 25 ते 28 अंश सेल्सिअस व जमिनीतील ओलावा चिकट पणा असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. जेव्हा जमिनीत चुनखडीचे प्रमाण असते तेव्हा त्या जमिनीत मर दिसून येते हलक्या जमिनीत तुर फुलांवर आल्या मर हा रोग येतो..

तूर पिकात मर रोग उपाय योजना

1. गेल्या वर्षी ज्या वावरात किंवा ज्या शेतात तुरीला मर लागली असेल त्या वावरामध्ये तुर घेण्याचे टाळावे
2. ज्या शेतातील तुरीला गेल्या वर्षी मर लागली होती त्या तुरीचे बियाणे यावर्षी पेरणीसाठी वापरू नये
4. ट्रायकोडर्मा व्हिरीडी चार कि ग्र प्रति एकर 50 टोपले शेणखतामध्ये मिसळून आठ दिवस आंबट ओले करून ठेवावे व शेवटच्या पाळी यादी प्रतिएकर मिसळून घ्यावे. तुर पिकांची
5. पेरणीपूर्वी तुरीला रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी यासाठी कार्बोक्ज़ीन35 टक्के +थायरम 35 टक्के असलेले संयुक्त रासायनिक बुरशीनाशक तीन ग्राम प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापरावे...

मर रोगाच्या प्रतिबंधासाठी, ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक २ किलो प्रति एकरी शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये मिसळून द्यावे. मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच, कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा १ टक्का बोर्डो मिश्रणाची आळवणी करावी किंवा बायोमिक्स दोन वेळी द्यावे. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. शेतात पाणी साचू देऊ नये. जास्त पाणी झाल्यास चर काढून ते बाहेर काढावे..

रासायनिक बुरशीनाशक म्हणजे रोको, एलीएट, रेडोमिल गोल्ड,ऐप्रान, एक्स एल आळवणी किंवा फवारणी केली तर चांगला फरक पडतो.

हे पण वाचा

Tags