Type Here to Get Search Results !

नाशिक मधील गोदावरी नदीला पूर. जायकवाडी धरण पाणीसाठा.

 नाशिक मधील गोदावरी नदीला पूर आला.सध्या नाशिक व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने गंगापूर धरणात चांगली आवक चालू आहे नाशिक मधील गंगापूर धरण 100 टक्के भरले असून या धरणातून 6 हजार कुसेक ने गोदावरी नदीत पाणी सोडले आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

 त्यामुळे या नदीला पुर आला असून नाशिक मधील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यन्त पाणी आले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

जायकवाडी धरणातही मोठ्या प्रमाणात आवक चालू आहे. आज 22 सप्टेंबर रोजी धरणातील पाणीसाठा हा 75 टक्के झाला आहे.

हे पण वाचा-

 2020 पिक विमा लाभार्थी यादीTags