Type Here to Get Search Results !

गहू आणि साखर किंमतीवर सरकारचे नियंत्रण..

 Wheat Price Down 

गहू आणि पीठाच्या किरकोळ किमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत सरकारनं 18.09 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री केली आहे. भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) खुल्या बाजारात या गव्हाची विक्री केली आहे. 

गव्हाच्या सध्याच्या हमीभावाच्या दराने म्हणजेच 2 हजार 125 रुपये प्रति क्विंटल या राखीव दरानं केंद्र सरकारनं गहू उपलब्ध केला आहे. सरकारकडे मुबलक प्रमाणात गहू साठा असल्याने सरकारने हा निर्णय घेतला, त्यामुळे गव्हाची किंमत आटोक्यात राहील.

Sugar Price lock : 

साखरेच्या वाढत्या दरावर (Sugar Price) नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी सरकारनं व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, प्रक्रिया करणाऱ्यांना दर आठवड्याला साखरेचा साठा जाहीर करणं बंधनकारक केलं आहे. या व्यापाऱ्यांना प्रत्येक सोमवारी https://esugar.nic.in या पोर्टलवर भेट देऊन त्यांच्या साखर साठ्याची माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाला द्यावी लागणार आहे.

Tags