Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद योजना ऑनलाइन अर्ज सुरू

 नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. जिल्हा परिषद योजना २०२२ अंतर्गत विविध योजनांसाठी अर्ज करता येतो. जिल्हा परिषद योजना २०२२ अंतर्गत खालील योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

zp_scheme-_form


  • मिरची कांडप यंत्र
  • तुषार संच.
  • 5 HP पाण्यातील विद्यत मोटार.
  • झेरॉक्स मशीन.
  • पिठाची गिरणी.
  • अपंगाना झेरॉक्स मशीन.
  • अपंग व्यक्तीसाठी सायकल.
  • अपंग व्यक्तीसाठी मिनी पिठाची गिरणी पुरविणे


जिल्हा परिषद योजना २०२२ अंतर्गत कोणकोणत्या योजना सुरु झालेला आहेत आणि ते अर्ज मोबाईलवरून कसे सादर करता येतात या संदर्भातील माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत बघा.


 अर्ज कसा करावा ते पहा 👇

गुगलच्या सर्च बारमध्ये   zp yojana टाका आणि सर्च करा.

जिल्हा परिषदेची वेबसाईट ओपन होईल. वेबसाईटवर डायरेक्ट जाण्यासाठी येथे क्लिक करा.

समाज कल्याण विभाग निवडा.

विभाग निवडल्यानंतर विविध योजनांची यादी दिसेल त्यामधील ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ती योजना निवडा आणि अर्जामध्ये माहिती भरण्यास सुरुवात करा.

अर्जामध्ये पूर्ण माहिती भरून झाल्यावर अर्ज सबमिट करा.

 अर्ज सबमिट कराल त्यावेळी अर्ज pdf मध्ये ओपन होईल. या अर्जाची प्रिंट काढून घ्या आणि पंचायत समिती येते अर्ज सादर करून द्या.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

जिल्हा परिषदेच्या या विविध योजनांचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर काही काही कागदपत्रे अर्जदारास या अर्जासोबत जोडायची आहेत. ती कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

आवश्यक कागदपत्रे काय आहे

आधार कार्ड.

रेशनकार्ड.

रहिवासी प्रमाणपत्र.

लाभार्थी हा दारिद्र रेषेखाली असेल तर प्राधान्य.

जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकार्‍याचे असणे आवश्यक राहील.

यापूर्वी कृषी विभाग महिला बालकल्याण किंवा इतर विभागामार्फत लाभ घेतलेले नसल्याचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र.

दिव्यांग असेल तर  सक्षम प्राधिकारी यांचे ऑनलाइन प्रमाणपत्र 40% पेक्षा कमी नसावे.

यापूर्वी लाभ न घेतल्याचे घोषणापत्र.

Tags