Type Here to Get Search Results !

अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी ईपीक पाहणी अट रद्द

 E-Peek Pahani 2022

राज्यातील अतिवृष्टीबाधित झालेल्या शेतीच्या पंचनाम्यासाठी असलेली ई-पीक पाहणी अनिवार्य होती. परंतु सध्यतरी ही (E-Peek Pahani 2022) अट राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी रद्द केली आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना (maharashtra Farmers) मोठा दिलासा मिळणार आहे. पंचनामे करताना येणारी ही अडचण आता दूर होणार असल्याने बळीराजाला लवकर मदत होण्यास मदत होईल हे मात्र नक्की.

तलाठी, कृषी सहाय्यकांना प्रत्यक्ष पंचनामे करणार

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन दिवस अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची अट रद्द करावी अशी मागणी केली होती. तांत्रिक अडचणीमुळे लाखो शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले होते. यामुळे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर्षी ई-पीक पाहणीची अट तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करावे लागतील. मात्र कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही हीच सरकारची भूमिका असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Tags