Type Here to Get Search Results !

या कारणामुळे पोलिस भरती पुढे ढकलली, वाचा सविस्तर..

Maharashtra Police Recruitment 2022 

महाराष्ट्र पोलिस भारती 2022 स्थगित

नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती.  राज्यभरात तब्बल 14956 पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (SRPF bharati 2022) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.

प्रशासकीय कारणामुळे पोलिस भरती पुढे ढकलली

राज्य सरकारनं पोलीस भरतीला तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजी न करता आपली तयारी कायम ठेवावी, असे आवाहन एबीपी माझाकडून करण्यात येत आहे. आज स्थगिती देण्यात आलेली भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकिय कारणास्थव पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली आहे. 

Tags