Type Here to Get Search Results !

आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंकआहे चेक करा असे...

 नमस्कार बंधुनो तुमच्या आधार कार्ड ला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे कसे जाणून घ्यावे ही माहिती आज आपण पाहणार आहोत.

आज आपल्याला आधार कार्ड खूप महत्त्वाचे ओळखपत्र आहे. पण आधार कार्ड साठी आता आपण मोबाईल नंबर लिंक असने ते सुद्धा महत्त्वाचे आहे. तर आपण बऱ्याचदा आपला नंबर विसरून जातो किंवा आपल्याला माहिती नसते.

असा चेक करा तुयमचा मोबाईल नंबर

  • सर्वात आगोदर  www.uidai.gov.in या पोर्टल वरती जावे लागेल त्यानंतर,
  • आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार, 
  • माझा आधार’ टॅप मधील. सत्यापित ईमेल किंवा मोबाईल नंबर वर क्लिक करा. 
  • यानंतर तुम्हाला सिस्टम वर एक नवीन टॅब उघडलं. 
  • तेथे आपल्याला आधार नंबर टाकावे लागणार. 
  • आपण  सत्यापित करू इच्छिता तो मोबाईल नंबर व ई-मेल प्रविष्ट करा 
  • यानंतर तुम्हाला एक कोड प्राप्त होईल, तो टाकावा लागेल.

प्रविष्ट केलेला मोबाईल नंबर आणि आधार डेटाबेस जुळत असल्यास, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की आपण प्रविष्ट केलेला मोबाईल क्रमांक आधींच रेकॉर्डमध्ये लिंक आहे. जर आपला नंबर लिंक नसेल तर त्या डेटाबेस जुळत नसेल. तर आपल्याला सांगितले जाईल की प्रविष्ट केलेला मोबाईल नंबर रेकॉर्डची जुळत नाही.

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा 👇

आपल्याला आधार मध्ये मोबाइल क्रमांक नोंदण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल त्याचे मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा आपला नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये शुल्क आकारले जाते.

 मोबाईल नंबर आधार मध्ये अपडेट करण्यासाठी प्रक्रिया ऑनलाइन होत नाही यासाठी जवळच्या अधिकृत  आधार केंद्राला भेट द्यावी.