Type Here to Get Search Results !

लम्पी आजारामुळे मृत पावलेल्या जनावरांच्या मालकांना मदत जाहीर! किती आर्थिक साहाय्य?

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! लम्पीमुळे आजारामुळे शेकडो जनावांचा मृत्यू, अखेर सरकारकडून मदतीची घोषणाशेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात ( Agriculture News) लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांचं (Farmers) मोठं नुकसान झालंय. एकीकडे जनावरं आजारी पडून दगावत आहेत. तर दुसरीकडे अतिवृष्टी मुळे आर्थिक संकट ओढवलंय. 

आता राज्य सरकारनं (State Government) शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय घेतला आहे. लम्पी आजारामुळे दगावलेल्या जनावरांच्या मालकाला आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. बुधवारी (12 ऑक्टोबर, 2022) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.

कुणाला किती अर्थसहाय्य?

दुधाळ गायीचा मृत्यू झालेला असल्यास मालकाला 30 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे बैलाचा मृत्यू झाल्यास 25 हजार रुपयांचं आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. तर वासराचा मृत्यू झाल्या 16 हजार रुपयांची मदत संबंधित मालकाला मिळणार आहे.

पशुसहाय्य
गायरुपये 30000/- 
बैलरुपये 25,000/-
वासरंरुपये 16,000/-

महाराष्ट्र सरकारकडून कडून मदतीचा शासन आदेश बुधवारी जारी करण्यात आलाय. 4 ऑगस्टपासून ज्यांची जनावरं लम्पी आजारामुळे मृत्युमुखी पडली आहेत, त्यांना सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

लंम्पी अनुदान काय असणार निकष?

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषांप्रमाणे ही मदत जाहीर करण्यात आली आहे. अल्प भूधारक, अत्यल्प भूधारक हे निकष शिथील करून राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषांप्रमाणे सर्वांना अर्थसहाय्य मिळावं, या अनुषंगाने राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे.

मृत पशुधनाच्या संख्येवरील निर्बंधांचे निकष सुद्धा ही मदत देताना शिथील करण्यात येणार आहेत. लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी, पशुपालक यांच्याकडे असलेल्या पशुधनाचा मृत्यू झाला, अशा सर्व शेतकरी, पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याचे निर्देश देण्यात आलेत. या निर्णयामुळे असंख्य शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Tags