Type Here to Get Search Results !

मोबाइल वरून पीक नुकसानीची तक्रार अशी नोंदवा...

 पीक नुकसान  भरपाई अर्ज कसा करावा


पीक विमा भरला तरी तक्रार अर्ज करावा लागेल

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिक नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुमची पीक नुकसान तक्रार नोंद होऊन विम्याची मिळू शकेल. 

काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी या माध्यमाद्वारे विमा कंपनीस माहिती देऊ न शकल्यास विमा कंपनीचे तालुका किंवा जिल्हा प्रतिनिधी, संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे प्रत्यक्ष २ प्रतीत अर्ज देऊन एका प्रतीवर पोहोच घ्यावी

विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पिक नुकसानीची माहिती कंपनीस देणे आवश्यक आहे. त्यासाठी पिक विमाधारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून क्रॉप इन्शुरन्स ( Crop Insurence) हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी.

पीक विमा पावतीवरील विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा विमा कंपनीचे ‘ whatsapp number’ याद्वारे नुकसानीची माहिती दतुम्ही देऊ शकता.

विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीठ, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग याचे पंचनामे करून निश्चित करण्यात येते असते.

crop insurance app

crop insurance app संदर्भात माहिती जाणून घेवूयात. तुमच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असेल तर त्याची सूचना पिक विमा कंपनीस कशी द्यावी. या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

जेणे करून तुमच्या शेतातील पिकांचे देखील नुकसान झाले असेल तर तुम्हाला यासाठी पिक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळू शकते.

crop insurance app चा उपयोग करून पिक नुकसानीची सूचना विमा कंपनीस कशी दिली जाते या संदर्भातील व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची नोंद पिक विमा कंपनीकडे करू शकता.

स्मार्टफोन मोबाईल मधील क्रॉप इन्सुरन्स ॲप crop insurance app वापरून शेतकरी बांधवांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची सूचना पिक विमा कंपनीस कशा पद्धतीने दिली गेली या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पिक नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानीची सूचना कंपनीस कळविणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवानी पिक विमा काढलेला असेल तर पिक विमा पावती किंवा पॉलिसी क्रमांक शेतकऱ्यांकडे असणे गरजेचे आहे.

शेतकरी बंधुंनो चला तर आता जाणून घेवूयात कि crop insurance app वापरून शेतातील नुकसानग्रस्त पिकांची नोंद कशी करावी.

क्रॉप इन्सुरन्स ॲप crop insurance app वापरण्याची पद्दत

सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये क्रॉप इन्सुरन्स ॲप crop insurance app डाउनलोड करा.

हे ॲप ओपन केल्यावर अनेक पर्याय दिसतील त्यापैकी continue without login या पर्यायावर क्लिक करा.

त्यांतर crop loss हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

crop loss intimation या पर्यायावर क्लिक करा.

आता शेतकरी बांधवाना त्यांचा सक्रीय असलेला १० अंकी मोबाईल नंबर चौकटीमध्ये टाकायचा आहे आणि Sent OTP या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

शेतकरी बांधवाना आता पुढील माहिती भरावी लागेल. 

१) सीजन या चौकटीमध्ये खरीप हा पर्याय निवडा. 

२) Year या चौकटीमध्ये वर्ष निवडा म्हणजेच २०२२ हा पर्याय निवडावा. 

३) scheme या चौकटीमध्ये pradhan mantri fasal bima yojana हा पर्याय निवडा. 

४) स्टेट मध्ये महराष्ट्र सिलेक्ट करा.

सर्वात शेवटी Select हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

from where did you enroll म्हणजेच हा अर्ज तुम्ही कोणत्या ठिकाणी भरलेला आहे तो पर्याय दिलेल्या यादीतून निवडावा जसे कि Bank, csc, farmer online, intermediary.

Do you have a application or policy number असा एक पर्याय दिसेल. शेतकऱ्यांकडे अर्ज भरतांना जर पिक विमा पावती असेल तर या पर्यायासमोरील बटन ऑन करा.

आता शेतकरी बांधवाना त्यांचा पॉलिसी क्रमांक दिसेल त्यावर क्लिक करा.

पॉलिसी क्रमांकावर क्लिक करताच शेतकऱ्यांनी भरलेली सर्व पिक विमा माहिती या ठिकाणी दिसेल. ज्या पिकांचा पिक विमा काढलेला आहे त्या सर्व पिकांची नावे दिसतील. 

ज्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यावर टच करा आणि पिक नुकसानीचा रिपोर्ट करा.

वरील माहिती भरल्यानंतर आता शेतकऱ्यांना Report Incidence म्हणजेच नुकसानग्रस्त पिकांचा रिपोर्ट करायचा आहे. मोबाईल स्क्रीनवर एक फॉर्म दिसेल त्यामध्ये खालील माहिती भरायची आहे.

Type of Incidence मध्ये विविध पर्याय तुम्हाल दिसतील. ज्या कारणास्तव नुकसान झाले असेल ते कारण निवडावे. जास्त पावसाने नुकसान झाले असेल तर excess rainfall हा पर्याय निवडावा. त्यांनतर तारीख टाका.

Status of crop at the time of incidence असा एक पर्याय दिसेल म्हजेच पिकांची स्थिती काय आहे हि दिल्याया पर्यायातून निवडावी. Standing crop, Harvested, cut and spread bundled condition of drying.

पिक नुकसानीची टक्केवारी टाकावी.

रिमार्कमध्ये शेतकरी त्यांची सूचना थोडक्यात टाकू शकतात.

फोटो अपलोड करावा.

व्हिडीओ अपलोड करावा.

सर्वात शेवटी सबमिट या पर्यायावर टच करून अर्ज सादर करा.

जसे हि तुम्ही हा अर्ज सादर कराल त्यावेळी एक डॉकेट आयडी तुम्हाला मिळेल पुढील कार्यवाहीसाठी हा एक डॉकेट आयडी सांभाळून ठेवा जेणे करून तुम्हाला तुमच्या तक्रारीची स्थिती कळेल.


क्रॉप इन्सुरन्स क्लेम स्टेट्स कसे पाहावे crop insurance claim status

क्रॉप इन्सुरन्स क्लेम स्टेट्स पाहण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

परत एकदा तुमच्या मोबाइल मधील क्रॉप इन्सुरन्स ॲप ओपन करा.

continue without login या पर्यायावर क्लिक करा.

crop loss या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर crop loss status या पर्यायावर क्लिक करा.

जो डॉकेट आयडी तुमच्याकडे आहे तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका.

जसे हि तुम्ही तुमचा डॉकेट आयडी दिलेल्या चौकटीमध्ये टाकाल त्यावेळी तुम्ही पिक विमा कंपनीस सादर केलेल्या पिक नुकसानीची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल. यामध्ये तुमच्या अर्जाचे स्टेट्स पेंडिंग आहे किंवा approve झाले आहे हे देखील कळेल.

तर अशा पद्धतीने शेतकरी त्यांच्या शेतीतील नुकसानग्रस्त crop insurance app वापरून करू शकतात. हि माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

पिक नुकसानीची तक्रार ॲप डाउनलोड करा 👇

क्रॉप इन्सुरन्स ॲप crop insurance app हे ॲप्लिकेशन Google Play Store वरून डाउनलोड करून शेतकरी त्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची माहिती पिक विमा कंपनीस देवू शकतात.

पिक नुकसान तक्रार स्टेट्स कसे पहावे

क्रॉप इन्सुरन्स ॲप द्वारे पिक नुकसानीची माहिती दिल्यावर एक डॉकेट आयडी मिळतो त्या त्याद्वारे शेतकरी त्यांनी सादर केलेल्या पिक नुकसान सूचनेचे स्टेट्स चेक करू शकतात.

शेतकरी स्वतः हे ॲप वापरून नुकसानग्रस्त पिकांची सूचना ऑनलाईन देवू शकतात किंवा शेतकरी हे ॲप वापरण्यासाठी इतरांची मदत देखील घेवू शकतात.

Tags