Type Here to Get Search Results !

50 हजार प्रोत्साहन अनुदान खात्यात कधी व कसे जमा होणार?

पीक कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अधिकाधिक ५० हजारांपर्यंतचे अनुदान उद्यापासून जमा होणार 

आधार प्रमाणीकरण केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. आधार प्रमाणीकरण करताच खात्यावर पैसे जमा होणार आहेत.  कर्जमाफी प्रोत्साहन अनुदान हे तीन टप्प्यात जमा होणार आहे. 

पात्र लाभार्थींनी महा ई सेवा केंद्र, सीएससी सेंटर, आपले सरकार केंद्र येथे आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरणासाठी आधार कार्ड, मोबाईल घेऊन जावे, असे आवाहन सहकार प्रशासनाने केले आहे.

प्रोत्साहन अनुदानासाठी पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर तातडीने प्रोत्साहनची रक्कम खात्यावर जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरण मोफत आहे. यासाठी पैसे देण्याची गरज नाही

कोणाला मिळणार 50 हजार अनुदान 👇

who is eligible for crop loan 50000 subsidy

महाविकास आघाडी सरकारने २०१९ मध्ये शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेतून नियमित पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देय होते. सहकार विभागाने या योजनेंतर्गत निकषानुसार २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षात नियमित परतफेड केलेल्या तीन लाख १९ हजार ८०३ शेतकऱ्यांची नावे शासनाच्या महापोर्टलवर अपलोड केली. 

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजारपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार आहे. यासाठी सेवा केंद्रावर जाऊन संबंधित शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे.

इन्कमटॅक्स भरल्यास अपात्र 

इन्कमटॅक्स भरलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही. मात्र, इन्कमटॅक्स भरण्याइतपत उत्पन्न नाही; पण बँक कर्ज व विविध कारणांसाठी आयटी रिटर्न भरलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे.

या शेतकर्‍यांना लाभ नाही 👇

इन्कमटॅक्स भरणारे, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य व आमदार, खासदार, सरकारी नोकरांना प्रोत्साहनचा लाभ मिळणार नाही. 

पात्र असूनही पहिल्या आणि अंतिम पात्र यादीत नाव नसेल तर संबंधितास सहकार विभागाकडे दाद मागता येणार आहे.

Tags