Type Here to Get Search Results !

ई-पीक पाहणीला (E pik Pahani) या तारखेपर्यंत मुदतवाढ..

E pik Pahani | यावर्षी राज्यात अतिवृषी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या शेती (Agriculture) पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक (Financial) मदतीकरता  निधी वितरीत करण्यात मंजुरी देण्यात आलीय. 


मात्र, या मदतीसाठी शेतकऱ्यांनी  ई-पीक पाहणी प्रक्रिया करणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ घेता येणार नाही. आता याच ई-पीक पाहणी प्रक्रियेला मुदत वाढ करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात ई-पीक पाहणीला (E pik Pahani) किती तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ही ई-पीक पाहणी प्रक्रिया कशी करावी.

सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट! पीएम किसानचे 2 हजार झाले जमा.

कधीपर्यंत करता येणार ई-पीक पाहणी?

शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी किंवा अतिवृष्टी भरपाई मिळवण्यासाठी असो ई-पीक पाहणी प्रक्रिया (Lifestyle) महत्वाची आहे. आता शेतकऱ्यांना 22 ओक्टोबर 2022 पर्यंत ही ई-पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडून अतिवृष्टी भरपाईचा लाभ मिळविण्यासाठी त्वरित ही ई-पीक पाहणी प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

अतिवृष्टीची किती मिळणार मदत?

शेतकऱ्यांना निकषानुसार जिरायत शेतीतील पिकाच्या (Agriculture in Maharashtra) नुकसानीसाठी 13 हजार 500 रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत. बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत. तर बहुवार्षिक पिकाच्या मदतीसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वितरीत केले जाणार आहे.
Tags