Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री किसान योजना महाराष्ट्रात लागू होणार..

मुख्यमंत्री किसान किसान योजना महाराष्ट्र 2022

महाकिसान

कोण आहेत पात्र शेतकरी 👇

मुंबई: शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारने दिली आहे. केंद्र सरकारप्रमाणे आता राज्य सरकार देखील पीएमकिसान योजनेच्या (pmkisan yojana) धर्तीवर आता महाराष्ट्र मुख्यमंत्री (mahakisan yojana) किसान योजना लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने तसा निर्णय जाहीर केला आहे.

केंद्र सरकारचे वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आणि त्यात आता राज्य सरकारचे सहा हजार रुपये मिळतील अशी शक्यता आहे. परंतु ही योजना कधी लागू होणार त्याचे अति व नियम याबाबत अजून निर्णय झाला नाही. 

महाकिसानयोजना कधी लागू होणार 👇 

केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना वर्षकाठी 6 हजार रुपयांची मदत देते. ती मदत शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यावर शासनाकडून जमा केली जाते. हीच पद्धत राज्यातही वापरली जाईल अशी शक्यता आहे. राज्यात राबविली जाणारी महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना लवकरच लागू करण्यात येईल असे आश्वासन दिलेले आहे.

शेतकऱ्यांना शेती पीक घेतांना आर्थिक अडचण निर्माण झाल्यास शासनाची मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने वर्षाकाठी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. अशीच मदत शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मिळाल्यास अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 

 केंद्रप्रमाणे नियम असतील तर पात्र शेतकऱ्यांना त्याचा फायदा लगेच लवकर मिळू शकते. अन्यथा पुन्हा कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.

ट्रॅक्टर लाभार्थी लॉटरी 👉महा डीबीटी लाभार्थी यादी 
पीएम किसान योजना 👉लाभार्थी पात्र यादी
महा डीबीटी लॉटरी 2022 👉लॉटरी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री आवास योजना 👉घरकुल मंजूर यादी येथे पहा
Tags