Type Here to Get Search Results !

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ? साधारण एक महिन्याभरापूर्वीपासून राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेतील अभूतपूर्व बंड, भाजपासोबत शिंदे गटाचा तह आणि अविश्वसनीय शपथविधी. या सगळ्यामध्ये चर्चा होती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची. अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांची गुगलने एक वेगळीच ओळख करून दिली आहे.

फडणवीस मुख्यमंत्री होणारच असा ठाम विश्वास राज्याला असताना आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत आहोत आणि आपण त्यांना बाहेरून पाठिंबा देत असल्याची घोषणा फडणवीसांनी पत्रकार परिषदेत दिली. शपथविधीची वेळ जवळ आली. संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारच होते आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये डाव पलटला.थेट भाजपाचे राष्ट्रीय नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आदेश आला आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लागली.

अशा रितीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांची गुगलने एक वेगळीच ओळख करून दिलीये. गुगल सर्च केलं असता, देवेंद्र फडणवीस हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याची माहिती मिळत होती. ती बातमी प्रचंड विरल झाली असून,आता ही गुगलची चूक आहे का कोणीतरी खोडसाळपणा करून गुगलची दिशाभूल केलीय, ही बाब त्यांनाच माहीत. एवढ्या नाट्यमय संघर्षानंतरसर्वसामान्य माणसाला देखील देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याचं कळलंय, आता गुगलने मात्र आपली चूक दुरुस्त करून महाराष्ट्रचे उपमुखमंत्री असा उल्लेख केला आहे.

Tags