राज्यात पावसानं (Rain) उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) परिसरात पाऊस पडत आहे. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे.
आज विदर्भात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज पावासाचा यलो अलर्ट असून मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड तर पश्चिम महााष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. काही ठिकाणी मात्र, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पहाटेपासूनच मुंबईत पावासाला सुरुवात झाली आहे. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे.
1 सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात
दरम्यान, 1 सप्टेंबपासून राज्यात पावासाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पावसाचा जोर वाढणार असल्यानं शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती.
मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं हो