Type Here to Get Search Results !

या नागरिकांना एस टी बसचा मोफत प्रवास...

 Maharashtra Government  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या बसेस (ST Buses) मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल केली. राज्य सरकारने काल तीन महत्वाच्या घोषणा करत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारी कर्मचारी, 75 वर्ष पूर्ण केले ज्येष्ठ नागरिक, गोविंदा पथकातील गोविंदाबाबत महत्वाचे निर्णय घेतले. या निर्णयांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर आज शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन आहे. यावेळी पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत.

75 वर्षावरील नागरिकांना एस टी बसचा मोफत प्रवास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी खुप मोठी घोषणा केली. यापुढे 75 वर्षावरील नागरिकांना एस टी बसचा मोफत प्रवास असणार आहे. यापूर्वी नागरिकांना प्रवासात 50% सवलत होती, परंतु आता यापुढे जे नागरिक स्त्री किंवा पुरुष 15 ऑगस्ट 2022 रोजी 75 वर्ष किंवा त्यावरील असतील त्यांना आता एस टी बसचा मोफत प्रवास असेल.

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 3 टक्के महागाई भत्ता

महाराष्ट्र सरकारने  राज्य शासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील या नव्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल. त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होईल.

Tags