ड्रायव्हिंग लायसन्स असे डाउनलोड करा
ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे अर्थात वाहन चालवण्याचा अधिकृत सरकारी परवाना. प्रत्येक वाहनचालकाकडे हा परवाना असणं अनिवार्य आहे.. विना लायसन्सचे वाहन चालवताना आढळल्यास, तुमच्यावर मोठी दंडात्मक कारवाई होऊ शकते.. त्यातून नाहक मनस्ताप सहन करावा लागू शकतो..
खिशातून ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ हरवण्याची भीती असते. मात्र, काळजी करु नका.. आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सची ‘डिजिटल कॉपी’ सुरक्षित ठेवता येणार आहे..तुम्ही हे डिजिटल लायसन्स वापरु शकता.
लायसन्स असे करा डाऊनलोड
डिजिलॉकर अॅप
मोबाईलमध्ये ‘डिजिलॉकर’ अॅप डाऊनलोड करा.. नंतर त्याच्या मुख्यपृष्ठावर ‘तुम्हाला आवश्यक असलेली कागदपत्रे’ या विभागातून ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ पर्याय निवडा. पर्याय सूचीमधून ‘रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्रालय’ निवडा. तुमचा ‘ड्रायव्हिंग लायसन्स नंबर’ टाका.. नंतर ‘दस्तऐवज मिळवा’ या पर्यायावर क्लिक करा.. ‘पीडीएफ’ स्वरुपात परवाना डाउनलोड करता येईल..
डिजिलॉकर वेबसाइट
‘डिजिलॉकर’ अॅपप्रमाणेच ‘डिजिलॉकर’ वेबसाईटवरुनही परवाना मिळवता येईल.. त्यासाठी तुमच्या खात्यात ‘लॉग इन’ करा. मुखपृष्ठावर डाव्या कोपऱ्यात ‘दस्ताऐवज शोध’ निवडा. मेन्यूमधून ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ निवडा.. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयावर टॅप करा.. ‘ड्रायव्हिंग लायसन्स नंबर’ टाकून ‘दस्तऐवज मिळवा’वर क्लिक करा व ‘लायसन्स’ डाऊनलोड करा.
परिवहन सेवा वेबसाइट
परिवनह सेवा वेबसाईटच्या माध्यमातूनही ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ डाऊनलोड करता येते.. त्यासाठी सुरुवातीला ‘ऑनलाइन सेवा’ विभागातून, ‘ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा’वर क्लिक करा. प्रदान केलेल्या ‘ड्रॉप-डाउन मेन्यू’मधून राज्य निवडा.
‘ड्रायव्हिंग लायसन्स’ विभागात ‘प्रिंट ड्रायव्हिंग लायसन्स’वर क्लिक करा. तुमचा अर्ज क्रमांक व जन्मतारीख टाका. ‘सबमिट’ केल्यावर ड्रायव्हिंग लायसन्स माहिती पाहू शकता.. नंतर त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा ‘पीडीएफ’ स्वरुतात सेव्ह करु शकता.