Type Here to Get Search Results !

ऊसाच्या FRP मध्ये झाली वाढ, चालू वर्षी उसाला मिळणार इतका भाव..

 Sugarcane FRP 2022



मुंबई:
 ऊस दराबाबत सर्रास कानावर पडणारा शब्द म्हणजे एफआरपी. पण एफआरपी म्हणजे काय, त्याचा अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर एफीआरपीचं विस्तारित रुप म्हणजे फेअर रेम्युनरेटिव्ह प्राईस अर्थात रास्त आणि किफायतशीर दर. – सोप्या भाषेत साखर कारखान्यांनी ऊसाला दिलेला प्रतिटन दर – ऊसाचा एकूण उत्पादन खर्च आणि त्यावरील साधारण 15 टक्के नफा गृहित धरुन एफआरपी ठरवला जातो हा कृषिप्रधान देश आहे. तर महाराष्ट्राची ओळख जगभरात ऊस उत्पादक राज्य म्हणून केली जाते. कारण मोठ्या प्रमाणावर शेतीत (Agriculture) ऊसाचे पीक घेतले जाते. आता याचं शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून  ऊसाच्या एफआरपी मधे (Sugarcane FRP) वाढ करण्याबाबत हालचाली सुरू होत्या. ज्याचा निर्णय आता मार्गी लागला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक (Financial) घडामोडी समितीच्या बैठकीत ऊसाच्या एफआरपीत वाढ करण्यासंदर्भात बुधवारी (3 ऑगस्ट) निर्णय घेण्यात आला आहे.

ऊसाच्या एफआरपीत किती करण्यात आली वाढ?

शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करून देण्यात आली आहे. ज्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कारण ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढकरूनआता प्रती क्विंटल तब्बल 305 रुपये भाव मिळणार आहे. तर आतपर्यंतचा एफआरपी दर निश्र्चित झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एफआरपी दरात 2.6 टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना एफआरपी दरात प्रतिटन 150 रुपयांची वाढ मिळणारं आहे. तर हा एफआरपी दर ऑक्टोबर महिन्यापासून लागू होणार आहे.

Tags