Type Here to Get Search Results !

मराठा समाजाचा बुलंद आवाज, विनायक मेटे यांचे अपघातात निधन ...

shiv sangram Vinayak mete passed away: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालं आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झालाय.  मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. पण मुंबईत पोहोचण्याआधीच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. विनायक मेटे (Vinayak Mete) म्हणजे आंदोलनांचा बुलंद आवाज… सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारत सळो की पळो करून सोडणारे विनायक मेटे… मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरत आंदोलन करणारे विनायक मेटे… मराठा समाजाच्या आंदोलनांचा चेहरा. अश्या या नेत्याच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळलाय…

आज मराठा समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी पुण्याहून ते मुंबईला येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात जखमी झाल्यानंतर विनायक मेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही. जवळपास एक तासाहून अधिककाळ त्यांना मदतीसाठी प्रतिक्षा करावी लागली. उपचारांना उशीर झाल्याने त्यांना जीवाला मुकावं लागल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केलाय.

मेंदूला मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज

विनायक मेटे यांना 6.20 मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. पल्स नव्हते. बीपीही नव्हता ईसीजीमध्ये फ्लॅट लाईन दिसून आली होती. त्यांना आणलं तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता.ऑन द स्पॉट मृत्यू झाला, असं म्हणणं घाईचं ठरेल. पाच वाजून पाच मिनिटांनी अपघात झाला. पोलिसांना लिव्हर,छाती आणि डोक्यात मार लागला होता. ब्रेनस्टेम इंजरीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. पोस्टमॉर्टेमनंतर सविस्तर कळेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.


गाडीचा भीषण अपघात

विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये विनायक मेटे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात क्रिटीकेयर युनिटमध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

विनायक मेटे यांचं वय अवघं 52 वर्षांचं. त्यामुळे हे वय जाण्याचं नव्हे, अश्या भावना राज्यभरातून व्यक्त होत आहेत.

Tags