Type Here to Get Search Results !

मोफत धान्य वाटप योजनेला मुदत वाढ, किती मिळेल धान्य येथे पहा.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PM-GKAY)

(PM-GKAY) योजनेचा पाचवा टप्पा, मार्च 2022 मध्ये संपणार आहे. या योजनेला आणखी सहा महीने मुदत वाढ दिली आहे म्हणजे सप्टेंबर 2022 पर्यन्त मोफत रेशन चे धान्य मिळणार आहे.पीएमजीकेएवाय अंतर्गत आणखी सहा महीने रेशन चे धान्य मोफत मिळणार

समाजातील गरीब आणि दुर्बल लोकांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (PM-GKAY) आणखी सहा महीने म्हणजेच, सप्टेंबर 2022 पर्यंत (सहावा टप्पा) मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली.

Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PM-GKAY) योजनेचा पाचवा टप्पा, मार्च 2022 मध्ये संपणार आहे. पीएम-जीकेएवाय ची अंमलबजावणी एप्रिल 2020 पासून सुरु झाली असून, ही जगातली सर्वात मोठी अन्नसुरक्षा योजना आहे.

सरकारने आतापर्यंत या योजनेवर 2.60 लाख कोटी रुपये निधी खर्च केला असून, पुढच्या सहा महिन्यांसाठी, म्हणजेच सप्टेंबर 2022 पर्यंत आणखी 80 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामुळे, या योजनेसाठीचा एकूण खर्च 3.40 लाख कोटी रुपये इतका असणार आहे.

या योजनेअंतर्गत, 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्यवाटप केले जाणार असून, त्याचा संपूर्ण खर्च भारत सरकार करणार आहे.

काय मिळणार लाभ ?

या सहा महिन्यात, प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्यासाठीच्या रेशनच्या धान्याव्यतिरिक्त आणखी पाच किलो धान्य/प्रती व्यक्ती/प्रती महिना दिले जाणार आहे. म्हणजेच प्रत्येक कुटुंबाला, त्यांच्या नेहमीच्या धान्याच्या दुप्पट धान्य मिळणार आहे.

आता कोविडची लाट जवळपास नियंत्रणात आली असली, आणि देशभरात सर्व आर्थिक व्यवहारांनाही गती मिळाली असली, तरीही आर्थिक व्यवस्था सुरळीत होण्याच्या काळात, कोणतेही गरीब कुटुंब उपाशी राहू नये यासाठी, पीएमजीकेएवाय या योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

पीएम-जीकेएवाय  अंतर्गत, केंद्र सरकारने आतापर्यंत, म्हणजेच पाचव्या टप्प्यापर्यंत, 759 लाख मेट्रिक टन अन्न वितरित केले आहे. त्याशिवाय, सहाव्या टप्पात 244 लाख मेट्रिक टन मोफत अन्नधान्याचे वितरण केले जाणार आहे. यामुळे, या योजनेअंतर्गत एकूण, 1003 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप होईल.

one nation one ration card

तसेच, एक देश एक शिधापत्रिका अंतर्गत स्थलांतरित कामगारांना या योजनेनुसार देशात कुठेही अन्नधान्य घेता येईल. देशभरातल्या पाच लाख स्वस्त धान्य दुकानांमधून या योजनेचे धान्य त्यांना घेता येईल. आतापर्यंत घरापासून दूर असलेल्या 61 कोटींपेक्षा अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

एक देश एक रेशन कार्ड योजना काय आहे ?

एक देश एक रेशनकार्ड योजनेत 10 अंकांचं रेशन कार्ड असणार आहे. यातील पहिले दोन अंक राज्याचा कोड असणार आहेत. त्यानंतरचे दोन अंक रेशनकार्डच्या संख्येनुसार असतील. त्यानंतरचे दोन अंक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ओळख करुन देणारे असतील. दोन भाषांमध्ये हे रेशनकार्ड जारी केलं जाणार आहे. एक स्थानिक भाषेत असणार आहे, तर दुसरं हिंदी भाषेत किंवा इंग्रजी भाषेत असणार आहे.

रेशनचे धन्य घेण्यासाठी आता शिधापत्रिकेची गरज नाही, आधार नंबर किंवा वर सांगितलेला 10 अंकी नंबर पुरेसा आहे.