Type Here to Get Search Results !

यापुढे वाळू लिलाव बंद, सरकार करणार घरपोहच वाळूची विक्री.

वाळूचे लिलाव बंद, सरकारच करणार वाळूची विक्री

 अहमदनगर : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून अलीकडेच लोणी येथे झालेल्या राज्यस्तरीय महसूल परिषदेत हे धोरण तयार करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणी आणि मागेल त्याला सरकारतर्फेच घरपोच वाळू विक्री करण्याचा या धोरणात समावेश असल्याचेही विखे पाटील म्हणाले.

 राज्यातील वाळू चोरी, वाहतूक आणि बेकायदा वाळू उत्खनन यावर आळा घालण्यासाठी लवकरच नवीन सर्वंकष वाळू धोरण जाहीर करण्यात येणार आहे. यापुढे लिलाव बंद करण्यात येतील. वाळूची विक्री सरकार मार्फत केली जाणार असून यामधून सरकारचा महसूल वाढेल असे महसूलमंत्रीविखे पाटील यांचे मत आहे .

मधल्या काळात लोणी येथे राज्यस्तरीय महसूल परिषद झाली. त्यामध्येही या विषयावर चर्चा झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंबंधीचे धोरण तयार करण्यात आले आहे. विरोधकांकडून यासंबंधी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. मधल्या काळात वाळू लिलाव बंद झाल्याने कामे ठप्प झाल्याचा आरोप करण्यात आला. आता हे धोरण अंतिम झाले आहे. 

अर्थात यावरही टीका होऊ लागली आहे. आतापर्यंत वाळूसंबंधी अनेक नियम केले, मात्र फारसे यश आलेले नाही. त्यामुळे हे नवीन धोरण किती यशस्वी होईल, हे आताच सांगता येणार नाही.

यासंबंधी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, नवीन वाळू धोरणाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत. आता गुजरातची वाळू आपल्याकडे आणि आपला महसूल गुजरातला जात आहे, अशी टीका थोरात यांनी केली.

Tags