Type Here to Get Search Results !

रब्बी पीक विमा 2021 अर्ज सुरू, लवकर करा अर्ज

 Rabbi Crop Insurance 2021

रब्बी हंगाम 2021 साठी पीक विमा अर्ज सुरू झालेले आहेत. कोणत्या पिकासाठी शेवटची तारीख किती असेल? पिकाचा हप्ता किती भरावा लागेल?  याबद्दल सर्व माहिती आज आपण पाहूया..

rabbi-pik-vima

रब्बी पीक विमा योजना 2021

रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, भुईमूग आणि कांदा या पिकाला पीक विम्याचे संरक्षण मिळावं यासाठी रब्बी पिक विमा अर्ज मागवले. यामध्ये अन्नधान्य आणि गळीत धान्याची जी पिके आहेत त्यासाठी विमा संरक्षित रकमेच्या दीड टक्के आणि कांद्यासाठी विमा संरक्षित रकमेचे 5 % एवढा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागतो.

रब्बी पीक विमा अर्जाची शेवटची तारीख 

या वर्षी म्हणजे 2021 मध्ये रब्बी ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर हे पीक विमा भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. गहू बागायती, हरभरा, कांदा आणि इतर पिके आहेत या पिकांसाठी 15 डिसेंबर 2021 ही शेवटची तारीख असणार आहे. तसेच उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग साठी 31 मार्च 2022 पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा पाहुया.

पीक विमा योजना कंपनी

राज्यामध्ये चौतीस जिल्ह्यांमध्येही रब्बीच्या पिक विमासाठी योजना राबवली जाते. भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, iffco-tokio एचडीएफसी आरगो बजाज अलायन्स आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून हे पीक विमा योजना राबवली जाते.

हे पण वाचा 👇

Tags