Type Here to Get Search Results !

आजचा पावसाचा अंदाज

 राज्यात आज मुसळधार पाऊस


राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, धारशिवसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे.कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान मागच्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, ठाणे या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याल रेड अलर्ट देण्यात आला आहे.

आजही राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे.नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपी संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्याला यलो अलरर्ट दिला असून काही ठिकाणी तुरळक पवासाची शक्यता आहे. तर पुणे, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर रायगड, ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे.