Type Here to Get Search Results !

मुळा धरणातून उन्हाळी आवर्तन सुरू

 Ahmednagar : मुळा धरणातून आज(5एप्रिल) रोजी शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. धरणातून नोव्हेंबर २०२३ मध्ये १.९६ टिएमसी पाणी जायकवाडीला सोडण्यात आले असल्याने ४५ ऐवजी ३० दिवसांचेच आवर्तन असणार आहे.


कालावधी कमी झाल्याने शेतकऱ्यांना १५ दिवस कमी कालावधीत आवर्तन मिळणार आहे. 

 ३० हजार हेक्टरसाठी मागणी आलेली आहे. त्यानुसार मुळा जलसंपदा विभागाने सिंचनासाठी शुक्रवारी उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या आवर्तनाद्वारे ३ हजार ५८१ दलघफू पाणी सोडण्याचे नियोजन आहे. सिंचनासाठीचे आवर्तन सुरू झाल्यानंतर पाणी चोरीचे प्रकार होऊ नयेत, तसेच मारहाण होऊ नये, यासाठी १४४ कलम नगर उपविभागीय अधिकाऱ्यांनी मुळा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात लागू करण्यात आले आहे.