Type Here to Get Search Results !

नगर जिल्हा विभाजन शिर्डी होणार नवीन जिल्हा

शिर्डी - नवीन उपजिल्हाधिकारी कार्यालय सुरू 

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यात आले आहे.  सदर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहूरी या तालुक्यांचा समावेश असणार आहे


अहमदनगर जिल्हा विभाजन

नगर जिल्ह्यातील उत्तरेकडील  जनतेच्या सोयीसाठी राज्यात शिर्डी  येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यात येत असून तशी अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. (New Upper Collectorater office at Shirdi started at shirdi)

अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे. सदर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर संगमनेर, अकोले व राहूरी या तालुक्यांचा फायदा आहे.

शिर्डी आणि अहमदनगर कार्यालय अंतर्गत खलील प्रमाणे तालुके असणार आहे.

शिर्डी कार्यालय :- कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहूरी.

अहमदनगर :- नेवासा, शेवगाव, पाथर्डी,कर्जत,जामखेड, नगर,पारनेर,श्रीगोंदा.

नगर (Ahmednagar) जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. 17412 चौ. किमी असलेला हा जिल्हा तसा दोन भागात विभागाला आहे. उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा. जसं अहमदनगरच्या नामांतरावरुन (Ahmednagar Name Change) मागच्या वर्षांपासून राजकारण रंगत आहे, तसंच ते जिल्हा विभाजनावरुन (Division) देखील रंगत आहे. 

पुढील काळात नगर जिल्ह्याचे विभाजन होईल, त्यानुसार शिर्डी हे महत्वाचे ठिकाण असून, सरकार त्यानुसार नियोजन करत आहे. 

Tags