Monsoon Return News
Monsoon Back : मॉन्सूननं परतीचा प्रवास सुरू केल्याचं सोमवारी हवामान विभागाने जाहीर केलं. पुढील २-३ दिवसात वायव्य आणि लगतच्या पश्चिम भागातील आणखी काही भागातून मॉन्सून माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली. मंगळवारी संपूर्ण मराठवाडयासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात 26 ते 29 सप्टेंबर दरम्यान वीजांच्या गडगडासह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या भागात मुसळधार पाऊस 👇👇
हवामान विभागाने आज विदर्भातील यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. तर मराठवाड्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव. नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यासह कोल्हापुर, सातारा सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यासोबतच कोंकणातील मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यासह खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
राज्यात बुधवारी संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मॉन्सूननं सोमवारपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.