Type Here to Get Search Results !

अवकाळी पावसाने धुमाकूळ, वारा आणि गारपीठ पिकांचे नुकसान.

अवकाळी पावसाने धुमाकूळ

Unseasonal rain all over the maharashtra : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातल्याने बळीराजाची (Farmers) अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.  त्यामुळे यापूर्वी झालेल्या अवकाळीने प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची पुन्हा एकदा दैना झाली आहे.  मार्च महिन्यात दाणादाण उडवून दिल्यानंतर भर एप्रिल (April) महिन्यातही अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) महाराष्ट्रातील काही भागांत थैमान घातलंय. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, 6 एप्रिल रोजी राज्यातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. तर आज 7 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाड्यातील प्रमुख ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी ग्रामीण भागाला गारपीटीचा सामना करावा लागला.

यलो, ऑरेंज अलर्ट जारी

पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील 3 दिवसांसाठी यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, लातूर , बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.

राज्यात एप्रिलच्या सुरूवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. यादरम्यान बंगालच्या उपसागरात वादळाची स्थिती असल्याने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. राज्यात पुढच्या 24 तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह अन्य भागात विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

देशात सध्या अवकाळी परिस्थिती निर्माण झाली आहे. बांग्लादेशच्या ईशान्य तसेच राजस्थानच्या नैऋत्येकडील भागात चक्रिय वादळांची स्थिती आहे. त्यानुसार  6 ते 9 एप्रिल दरम्यान राज्यात मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भातील वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला यासारख्या बहुतांश जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली.

Tags